कथा एका आदिवासी ची भाग 4 | Adivasi Story | adivasi funny | Adivasi Shayari marathi |sad love Shayariकथा एका आदिवासी ची भाग 4.

आतापर्यंत तुम्ही पाहिले की सतीश सायली चे स्वप्न पूर्ण करणार असे वचन सायली ला देतो.
आता पुढे.

   श्रावण चा महिना होता.

चहूबाजूंना गारवा आणि थंड वारा वाहत होता.
त्यात चहुबाजूने डोंगर हिरवाई पसरलेली होती.
सतीश आणि सायली दोघेही त्या रोमांचक वातावरणामध्ये एकटे आणि अलौकिक निसर्गाचे दर्शन घेत होते..
सायली सतीशला बिरसा मुंडा बद्दलचे क्रांती आणि शौर्याची माहिती देत होती.
सतीश ही लक्षपूर्वक सर्वकाही ऐकत होता.
दोघांनाही वेळेचे भान हरपले होते.
सकाळची कधी दुपार झाली दोघांनाही कळाले नाही.
चला आता परत जायचं हाय की नाही?
सायली ने प्रश्न केला.

अजून थोडावेळ राहू या ना.
सतीश नाक मुरडत म्हणाला.

  आता आपण दुसऱ्या डोंगरावर जाऊ या. तुम्हाले काहीतरी नवीन दाखवायचं हाय.
जणू सतीश त्या क्षणाची वाट पाहत होता.
अजून नवीन ठिकाण?

तू मला खूप नवीन नवीन आश्चर्याचे झटके देत आहेस सायली
सतीश उत्साहाने सायलीला म्हणाला.

  दोघेपण नवीन डोंगरासाठी डोंगर रांगांच्या वाटेने निघाले.
डोंगर वाटेवर चालत असताना.
सतीश च्या समोर अचानक.
एक साप सरपटत आला.
   घाबरणे सतीशच्या स्वभावातच होते. तसा तो घाबरला. आणि
वीज पडावी आणि एका मुलीने मुलाच्या मिठीत हरवावे. तसाच सतीश सायलीला बिलगून वाचवण्याची विनंती करू लागला.

सायली मला सापाची लय भीती वाटते ग. हा आपल्याला डंक मारू शकतो.
 घाबरलेल्या आवाजात सतीश म्हणाला.
सतीश ची मिठी आता सीयली ला ही हवी हवी शी वाटत होती.

गंगा ने सतीश ची मिठी अधिक घट्ट केली.
तिचं हृदय वेगाने धडधडत होते.
अंगावर शहारे येत होते.
सतीश घाबरला होता म्हणून.
त्याला या सर्व फीलिंग्स येत नव्हत्या.
तो फक्त वाचव वाचव आणि फक्त मला वाचव.
फक्त याच शब्दांचा उदगार त्याच्या मुखातून होत होता.


कथा एका आदिवासी ची भाग 1

कथा एका आदिवासी ची भाग 2

कथा एका आदिवासी ची भाग 3

कथा एका आदिवासी ची भाग 4


0 Comments

Newest