कथा एका आदिवासी ची भाग 2.

      आतापर्यंत तुम्ही पाहिले की सायली नाचणाऱ्या खुर्ची जवळच्या परिसरात काही तरी शोधत होती.

सतीश देवीच्या दर्शनाला त्याच वाटेने जात होता.
जाताना सतीश ची नजर सायली कडे गेली.
सतीश ने शहरी पद्धतीत हात हलवून सायलीला हाय केले.
सायलीचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते.
सतीश तिच्याजवळ गेला आणि तिला नजरेनेच खुणावले. काय झाले.
तुम्ही आजही इथेच हाय?

आपली वस्तू शोधताना सायलीने प्रश्न केला.
यात्रा दर्शनाला आलो. आणि देवीचे दर्शन काल राहिलेच होते.
शहर येथून जास्त लांब नसल्याकारणाने. मला इथे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही.


सतीश सायली कडे पाहत म्हणाला.
परंतु तुम्ही काय शोधत आहात.?
प्रश्नार्थी स्वरात सतीशने प्रश्न केला.
मी माझे लॉकेट शोधत हाय.

जॅकाल इथेच कुठे तरी पडलं की काय. म्हणून मी शोधत ते लॉकेट. हाय.
मी तुमची लॉकेट शोधण्यात मदत करू का?
सतीश ने प्रश्न केला.

सायली त्याच्याकडे आश्चर्याच्या आणि प्रश्नार्थी भावाच्या नजरेने पाहत होती.
जणू तिला म्हणायचे होते ही काय विचारण्याची गोष्ट आहे!
अरे नाही मी शोधायला मदत करतो.

सायलीच्या नजरेला नजर भिडवत सतीश म्हणाला.
असं काय आहे त्या लॉकेटमध्ये?
लॉकेट शोधता-शोधता सतीश ने प्रश्न केला.
 ते लॉकेट माझी जीव हाय.

आपल्या अर्धी मराठी आणि अर्धी आदिवासी भाषेत सायली ने उत्तर दिले..
  अचानक गवते मध्ये. सतीश ला काहीतरी चमकणारी वस्तू दिसली.
सतीश ने त्या चमकणाऱ्या वस्तूच्या दिशेने आपली पावले पुढे टाकली.

सतीश पाहतो तर काय!
ते एक लॉकेट होते.
सतीश धावतच सायली च्या जवळ गेला.

काय ते हेच लॉकेट आहे?
सतीश ने प्रश्न केला.
सायली ने त्या लॉकेट ला बघितल्या क्षणी. तिचा आनंद गगनात मावेना असा झाला. आनंदाच्या भरात सायली ने सतीशला मिठीच मारली.
तुम्ही देव पावला तर शहरी बाबू.
खूप धन्यवाद. खूप आभार.

अनेक पद्धतीत सायली आपला आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमच सतीश समोर मांडत होते.
परंतु सतीशचे या सर्व गोष्टींकडे लक्षात नव्हते.
सतीश ला फक्त तिच्या मिठीत रहावे असे वाटत होते. सतीशच्या हृदयाचे ठोके लोकल पेक्षाही वेगाने धडधडत होते.

सतीश ला कळत नव्हते की त्याला काय होत आहे.
काहीतरी दोन मिनिटा पर्यंत दोघेपण एक-मेकांच्या मिठीतच होते. आपण जास्तच काहीतरी पुढे गेल्याची जाणीव सायलीला झाली.

आणि तिने आपली मिठी सोडवली.
या लॉकेटमध्ये असे काय आहे बरं! आश्चर्याच्या भावाने सतीश ने प्रश्न केला.

हे माझे देव हाय.

सायली ने आनंद अश्रूंना पुसद उत्तर दिले. काय देव?
सतीश आश्चर्याने म्हणाला.
हो बाबु. आमच्या आदिवासींचा हा देवच आहे.

कसला फोटो असेल त्या लॉकेटमध्ये
सतीश ला प्रेम तर नाही झाले.

वाचत रहा नक्कीच आपल्याला पुढच्या भागात कळेल.

NEXT PART


जर आपल्याला कथा आवडत असेल तर.
आपल्या समीक्षा नक्कीच पाठवा.
अभिप्राय अपेक्षित आहे.


कथा एका आदिवासी ची भाग 1

कथा एका आदिवासी ची भाग 2

कथा एका आदिवासी ची भाग 3

कथा एका आदिवासी ची भाग 4