कथा एका आदिवासी ची.. | adivasi story | adivasi shayari in hindi | love sharayari hindiकथा एका आदिवासी ची..

चहूबाजूंनी हिरव्यागार डोंगरांनी नटलेले.
जिथे रोज स्वर्ण किरणांनी सूर्योदय होत असे.
आणि अतिशय आकर्षित असा दृश्य घेऊन सूर्य मावळतीला जात असे.
राजापूर असे त्या गावाचे नाव.
गावात देव मोगरा देवीचे भव्य मंदिराची स्थापना झाली होती.

  देव मोगरा देवी.
आदिवासी लोकांची ती कुलदैवत आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यात या देवीची यात्रा भरत असे.

 म्हणतात या देवीजवळ आपली इच्छा मागितली तर ती पूर्ण होते.
अशी संपूर्ण गावातील लोकांची श्रद्धा होती..

  श्रावण चा महिना चालू होता.
संपूर्ण गावात भव्य यात्रा भरलेली होती.
ही यात्रा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होती.
शहरातील अनेक लोक या यात्रेत सहभागी होत असे.

   एके दिवशी अशीच यात्रा भरलेली होती.
सतीश त्याच्या मित्रांसह इत यात्रा दर्शनासाठी आला होता.
यात्रा म्हटली तर अनेक प्रकारच्या गोष्टींची स्वारी करणे..

  जसे. नाचणारी खुर्ची, आकाश पाळणा, लहान बाळांसाठी नकली रोडावर धावणारी रेल्वे. अजून भरपूर काही नवीन.


 सतीश ला आकाश पाळण्यात बसायला खूप भीती वाटत असे.
त्याचे अनेक मित्र त्याला चिडवायचे. परंतु सतीश वर त्याचा काळी मात्र चा परिणाम होत नसे..
सतीश चे सर्व मित्र आपल्याला आवडेल त्या गोष्टींची स्वारी करण्यासाठी यात्रेत चहुबाजूंना पसरुन गेले.
मात्र सतीश फक्त सर्वकाही पाहण्यातच आनंदात होता. असाच तो एका नाचणाऱ्या खुर्ची कडे वळाला.

      सर्व मुला मुली त्या नाचणाऱ्या खुर्चीचा आरडा ओरडा करून आनंद घेत होते.
सतीश आपल्या उघड्या डोळ्यांनी ते दृश्य पाहत होता. परंतु त्याला त्या खुर्चीत बसायला अत्यंत भीती वाटत असे. म्हणून त्याने गंमत पाहण्यातच आपलं भलं समजले..

अचानक. नाचणाऱ्या खुर्ची ची एक बेरिंग सहील झाली.. आणि त्या खुर्चीत बसलेली एक मुलगी सतीश च्या दिशेने फेकली गेली..

प्रसंगावधान राखत सतीशने त्या मुलीला आपल्या बाहुपाशात पकडून घेतले. दोघांचाही तोल चुकला आणि दोघेपण जमिनीवर कोसळून गेले. जमिनीवर गवत असल्याकारणाने कोणालाही दुखापत झाली नाही. जमिनीवर ती मुलगी आणि त्या मुलीवर सतीश चा आडवा तोल गेल्या कारणाने दोघांचे ही नजरेत नजर झाली.

     सतीश त्या मुलीच्या डोळ्यात हरवून गेला. आणि ती मुलगी देखील सतीश कडे टक लावून पाहत होती.
लोकांची गर्दी पाहून दोघे पण भानावर आले.

        आपको कुछ हुआ तो नही.? नाचणाऱ्या खुर्चीच्या मालकाने काळजीने विचारले.
सतीश ने कोणताही विचार न करता. त्या माणसाच्या कानात दोन लगाऊं दिले.

बेरिंग फिट करनी नही आती है तो क्यू चलता है? अगर इस लडकी को कुछ हो जाता तो? रागाने लाल झालेला सतीश म्हणाला माफ कीजिए बाबू. आगे से नही होगा. घाबरत नाचणाऱ्या खुर्ची चा मालक म्हणाला.

 जमलेल्या सर्व लोकांनी सतीश ला शांत केले.
मात्र त्या मुलीचा आवाज ऐकून.
सतीश चा राग नाहीसाच झाला जणू.
मी ठीक आहे शहरी बाबू.

अतिशय नाजूक आवाजात ती मुलगी म्हणाली.
जमलेले सर्व लोक आपल्या आपल्या मनोरंजनाच्या दिशेने निघून गेले.
सतीश परत त्या मुलीकडे वळाला. तुम्हाला काही झाले तर नाही ना.? काळजीचा स्वरात सतीशने विचारले.
नाही हम ठीक आहे.

अडखळत मराठी बोलत ती मुलगी म्हणाली.
सतीशला कळून चुकले की या मुलीला मराठी व्यवस्थित बोलता येत नाही.
सतीश त्या मुलीकडे टक लावून पाहत होता.

 रंगाने सावळी. डोळ्यात काजळ. कानात सुशोभित असे झुमके.
ओठांवर हसत असलेली तिची लाली. चमचम करणाराज घागरा चोळी तिने धारण केला होता.
पाहता क्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी ती.
आपल्या नजरेनेच तिने सतीशला घायाळ केले.

मी तुम्हाला घरी सोडतो. सतीश काळजीच्या स्वरात म्हणाला.
नाही बाबू मी मी ये गावाचेच आहे. ती मुलगी म्हणाली.
मी तुम्हाला सोडतो या.

सतीश जरा हक्कानेच म्हणाला.
तिलाही ते आवडले असावे.
ती लगेच तयार झाली आणि दोघेपण जरा अंतर राखून चालायला लागले.
एवढे काही घडून गेले. परंतु मी तुम्हाला तुमचे नाव देखील विचारले नाही? दोघांमध्ये असलेल्या शांततेला भंग करत सतीश म्हणाला.

माझे नाव सायली

नाजूक आवाजात त्या मुलीने आपला परिचय करून दिला.
तुमचे नाव काय हाय बाबू?
तिने अडखळत विचारले.
माझे नाव सतीश. असं म्हणत.
सतीश ने आपला परिचय दिला.

   दोघांमध्ये तिकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या.
वेळ कुठे निघून गेला दोघांनाही समजले नाही.
सायली चे घर जवळ आले होते.
इथून पुढे मी एकटीच जाणार.
सायली सतीश ला म्हणाली.
का बरं.?

सुरज ने आश्चर्याने प्रश्न केला.

     आमच्या गावात मुलगा-मुलगी एकत्र दिसल्यास. गावातले लोक संशय घेतात. सायली ने नजर खाली करून उत्तर दिले.
इच्छा नसतानाही सतीश ने आपली पावले परतीच्या दिशेने वळवले.
दुसऱ्या दिवशी.

सायली त्या नाचणाऱ्या खुर्चीच्या परिसरात काहीतरी शोधत होती.
सतीश देखील देवीच्या दर्शनासाठी त्याच मार्गाने दुसऱ्या दिवशी जात असताना. सायली त्याच्या नजरेला दिसली.


कोणती अशी वस्तू असेल जी सायली शोधत आहे.
सतीश आणि सायलीची परत भेट काय नवीन घडणार आहे?

यासाठी पुढचा भाग नक्कीच वाचा.

  NEXT PART


कथा एका आदिवासी ची भाग 1

कथा एका आदिवासी ची भाग 2

कथा एका आदिवासी ची भाग 3

कथा एका आदिवासी ची भाग 4

Post a Comment

0 Comments