कथा एका आदिवासी ची भाग ३ | adivasi story in marathi | adivasi love story | love shayari | sad shayari in hindi


कथा एका आदिवासी ची भाग ३

आतापर्यंत तुम्ही पाहिले की सायली सतीशला लॉकेट बद्दल सांगत होती.
काय आहे त्या लॉकेटमध्ये विशेष?
असा प्रश्न सतीश ला पडला होता.

तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर माझ्यासोबत जंगलात चला.
सायली सतीश ला म्हणाली.
सतीश एका पायावर तयार झाला.
मलाही जंगल फिरायला आवडेल.

नेहमी शहरात गर्दीत आणि वाहनांच्या गडबडीत असतो
सतीश शहराबद्दल कंटाळत म्हणाला.
आणि कुठेतरी सायली सोबत वेळ घालवण्याचा बहाना त्याला हवा होता.
आणि तो बहाना सायली नेच मिळवून दिला म्हणून त्याचा आनंद दुग्ना झाला.
दोघेपण यात्रेच्या गर्दीतून वाट शोधत जंगलाच्या दिशेने निघाले.
आजूबाजूला उंच डोंगर रांगा हिरवाईने नटलेल्या होत्या.

जंगलात प्रवेश केल्यानंतर चे दिसलेले हे दृश्य. त्यांच्या नजरेला पडले.
सर्वकाही सतीश आवाक आणि आश्चर्य च्या नजरेने पाहत होता.
जंगलातून चालत असताना निरनिराळे पक्ष्यांचे आवाज त्याच्या कानावर पडत होते.
जे प्राणी त्याने पाहिले नव्हते ते त्याच्या नजरेसमोर होते.


सतीश ला आश्चर्यात पाहत सायली संपूर्ण पक्षी आणि प्राणी सर्वांचा परिचय अतिशय विस्ताराने करत होते.
वातावरण अतिशय शांत होते.

श्रावण च्या महिना असल्यामुळे थंड वारे चहुबाजूंना वाहत होते.
दोघेपण चालत एका डोंगरा जवळ आले.
या सह्याद्रीच्या रांगा आहेत बाबू.
सायली त्या डोंगराचा परिचय करत म्हणाली.
आज पर्यंत मी फक्त पुस्तकात वाचले होते.
सतीश म्हणाला.

चला आपल्याला डोंगर चढायचा हाय.
सायली हसतच म्हणाली
काय! या डोंगरात वर आपल्याला जायचं आहे? प्रश्न आणि आश्चर्याच्या भावाने सतीश म्हणाला.
डोंगराची उंची पाहून सतीश हादरला. आणि थोडासा घाबरला

  तुम्हाला माझ्या लॉकेट बद्दल नाही का जाणून घ्यायचं हाय.
सायली सतीश कडे पाहत म्हणाली.
हो ना जाणून घ्यायचे आहे.
सतीश काळजीच्या स्वरात म्हणाला.
तर मग आता चला.

मी हाय ना. कायला काळजी करत हाय.
तू आहे म्हणून मी काळजी नको करू! सतीश आश्चर्यचकित होऊन सायली कडे पाहत म्हणाला.
आम्हाला इथली सवय हाय बाबू.
आमचे रोजचेच जाणे-येणे होते.या ठिकाणची कोपऱ्या कोपऱ्यात ची माहिती हाय मला बाबू.
सायली सतीश ला आपल्या आदिवासी स्टाईलमध्ये म्हणाली.

  सायलीने सतीश चाहात आपल्या हातात घट्ट. सतीश च्या नजरेला नजर भिडवली.
चलायचं हाय ना बाबू.
शांत स्वरात सायली सतीश ला म्हणाली.

तिचं असं वागणं पाहून सतीशला आश्चर्यच वाटले. त्याच्या हृदयाची स्पंदने पुन्हा एकदा वेगाने धडधडायला लागली.

तो फक्त हो का नाही एवढेच म्हणू शकला.
दोघांनी पण डोंगर चढायला सुरुवात केली.
सायली अतिशय वेगाने डोंगर चढून पुन्हा खाली येत होती.
आणि सतीश ला म्हणाली की
काहीच कठीण नाही सोपं हाय.

सतीश फक्त आश्चर्याच्या अतिरिक्त काहीच करू शकत नव्हता.
सायलीने सतीश चाहात आपल्या हातात घेऊन सतीश ला डोंगर चढायला शिकवले.
दोघेपण हळूहळू डोंगर चढू लागले.

अधून मधून सतीश चा पाय खाली घसरला तर सायली त्याला सावरत होती.
दोघांनीही आता अर्ध्याहून जास्त डोंगर चढून संपवला होता.
  आता दोघेपण डोंगरावर पोहोचले होते.

डोंगराच्या काठाशी उभे राहून सतीश ने स्वतःचा फोटो घेतला. म्हणजे सेल्फी घेतली.
उंच उंच झाडे अतिशय लहानशा रोपट याप्रमाणे वरून दिसत होते. सर्वकाही हिरवेगार होते.
सायली सतीश च्या मोबाईल कडे आश्चर्याने पाहत होती.
तुमच्याकडे टचिंग मोबाईल हाय?

सायली प्रश्नार्थी नजरेने सतीश ला म्हणाली.
अगं हो टचींग मोबाईलच हाय.
सतीश  ची नक्कल करत म्हणाला.
गंगा काहीसा हसली.

आपण दोघे पण एकत्र फोटो काढू या का?
सतीश सायलीला प्रश्न विचारत म्हणाला.
सायली नजरेने हो असं म्हणाली.
परंतु इथे नाय.
माझ्यासोबत चला.

सायली आणि सतीश दोघेपण एका सुंदर वाहणाऱ्या झऱ्याचे जवळ आले.
. सह्याद्रीवर असलेला छोटासा डोंगर.
त्या डोंगरावर हृदयाच्या आकाराने कोरले गेले होते.

त्या आकारातून पाण्याचा सुंदर धबधबा बाहेर पडत होता.
असं तर मी स्वप्नात देखील पाहिले नव्हते.
कल्पनेच्या पलीकडे आहे.
समोरचे दृश्य पाहत सतीश आश्चर्याने म्हणाला.
आता फोटो काढा.
सायली म्हणाली.

  दोघे पण काठावर उभे राहून सेल्फी काढू लागले. की अचानक!
सतीश चा पाय डोंगरावरून खाली घसरला.
खाली फक्त पाणीच होते.

चारशे पाचशे फूट अंतर होते.
जो कोणी पडला तो वाचणार नाही असंच काही.
परंतु सायली ने प्रसंगावधान राखत.

आपला हात सतीश च्या कमरेत घातला.
आणि सतीश ला आपल्या बाहुपाशात ओढून घेतले.
सतीश अतिशय घाबरला होता.

मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही.
मी मी तुमच्यासोबत हाय असं म्हणाली होती ना मी.
पायथ्याशी म्हणालेले वाक्य सतीश ला आठवण करून देण्यासाठी सायली म्हणाली.
तुझे खूप आभार ग. सायली

आता जर खाली पडलो असतो तर तुकडे पण सापडले नसते माझे.
सतीश असं म्हणणारच होता की सायली ने त्याचे तोंड दाबले.
असं म्हणायचं नाय बाबू.

मी हाय ना तर काळजी कायला करतात!
चला आता लॉकेट च्या बद्दल तुम्हाला दाखवते मॅप.
सायली म्हणाली.

   दोघेपण दुसऱ्या डोंगर-कडे निघाले.
आपण डोंगर रांगांवर चालत आहोत.
सतीशला स्वतःलाच आश्चर्य वाटत होते.
आता ते एका मध्यम डोंगराजवळ आले.
सतीश पाहतो तर काय!

जे चित्र त्याने लॉकेट वर पाहिले होते.
तेच चित्र उभ्या डोंगरावर कोरले होते.
डोक्यावर फौजेची टोपी.

हातात लांब लचक बंदूक.
पायात सुशोभित आर्मीचे रुबाबदार बूट.
ताठ छाती. ताठ मानेने.
बिरसा मुंडा यांचे चित्र कोरले गेले होते.
सायली मे त्यांना सलाम केले.
आणि आपली मान झुकवली.

  हेच आमचे देव हाय.
बिरसा मुंडा यांचे नाव हाय.
सायली त्या क्रांती वीराचे परिचय देत सतीश ला म्हणाली.
सतीश ला सायली चा सारखा अभिमान वाटत होता.
देश भक्त बद्दलचे तिथे प्रेम ओसांडून वाहत होते.
सतीश च्या मनात सायली बद्दलचे आदर अजून वाढवून गेला.

  आता तुम्हाला समजले हाय?
हेच आमचे देव हाय.
  
  मला पण यांच्यासारखे व्हायचे हाय.
सायली एका अपेक्षेने सतीश कडे पाहत म्हणाली.
 तुझा स्वप्न नक्की पूर्ण होणार सायली
मी तुला वचन देतो.

सतीश च्या मुखातून नकळत शब्द निघून गेला..

काय होणार पुढे?
सतीश सायली चे स्वप्न पूर्ण करणार?


सायली च्या मनात सतीश बद्दल प्रेम आहे?
सतीश चे प्रेम सायली वर आहे का?

  नक्कीच तुम्हाला पुढच्या भागात कळेल.  आपल्या समीक्षा माझ्यासाठी मौल्यवान आणि प्रेरणादायी आहेत.
आपला अभिप्राय नक्कीच कळवा.

लिहायला नवीन ऊर्जा मिळते.

Part - 3 

कथा एका आदिवासी ची भाग 1

कथा एका आदिवासी ची भाग 2

कथा एका आदिवासी ची भाग 3

कथा एका आदिवासी ची भाग 4

Post a Comment

0 Comments